तारामंडल हा एक सुंदर दागिना आहे. आकाशात चांदण्या जेवढा प्रकाश पाडतात तेवढा प्रकाश पाडणारी रत्ने या दागिन्यात आहेत. दोन्ही फाशांत दोनदोन असे चार मणी लावलेली ठुशांची पेटी घेऊन तिच्याखाली एक मणी ओवून त्या तर्हेने एकाबाजूस सव्वीस व दुसर्या बाजूस सव्वीस अशा पेट्या घालतात व मध्यंतरी घागर्यांचे थर लाविलेले मंगळसूत्र घालून हे सर्व एकत्र पटवून हा दागिना तयार करतात . [ तारा मंडल = वर्तुळ , समुदाय ]
Specifications
-Choker with adjustable cord
- Earrings included
- 92.5% Pure Silver with Antique Polish